चला बापु (गांधिजि) तुम्हाला तुमचा भारत दाखवतो.

चला बापु (गांधिजि) तुम्हाला तुमचा भारत दाखवतो.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही गावाकडे गेलोय आणि
गावातच शहर आणलित आणि गाव उध्वस्त केलीत.

तुम्हिच तर म्हणाला होतास की गवाकडे चला भारत देश गावामधे बसतो.
पण त्याचा अर्थ आम्ही आमच्या सोयीनुसार घेतला.

बापू आम्ही आमचि शहरि संस्कृती गावात नेली परंतु गावचा एकहि चांगला गुण घेतला नाही.
छोटी- छोटी घर पाडून मोठया-मोठया इमारती उभ्या केल्यात.
त्या इमारतीमधे माणसे शिरलित, माणुसकि मात्र हरवलिय.
सीमेंटच्या या जंगलात आम्ही आज चारचाकी गाड्यामधुन फिरतोय.
उघड्या पाउलाना तो मातीचा स्पर्श मात्र हरवलाय.

शहारात पैसा खूप कमवलाय त्यापासून भौतिकसुखे पण मिळवलित.
परंतु आं‍तरीक समाधान मात्र हरवलय.

एका खोलीत चार-चार मुलांना संभाळना-या आई-वडिलांना.
मुलांच्या चार-चार घरात त्यांच्यासाठी जागा नाही.
आम्ही पैश्याने श्रीमंति मिळवलिय मनाची श्रीमंती आम्ही गमावलिय

बाप्पु, असा हा तुमचा भारत आता india झालाय.

-KISHOR GHARAT

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a comment